आजच्या गतिमान विज्ञान युगामध्ये मनुष्याला सकस आहार हा दुरापास्त बनलेला आहे.समतोल व सकस आहार नसल्यामुळे मनुष्याला शारिरिक व मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते म्हाणूनच हजारो वर्षापासुन भारतीय ॠषी मुनींनी,संत सज्जनांनी आयुर्वेदावर संशोधन केलेले आहेत.ॠग्वेदाचा उपवेद म्हणुन आयुर्वेदाची गणना केली जाते. आशा या आयुर्वेदातून कुठलेही दुष्परिणाम न होऊ देता व्याधींचे समुळ उच्चाटन करण्यात येते. यामध्ये चरक,सुश्रूत,वाग्भट या ॠषीमुनींचे योगदान अतुलनीय आहे.

गेली ५० वर्षापासुन 'श्री स्वामी समर्थ' सेवा कर्यातून सद्गुरु प.पू.मोरेदादा व प.पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे या सद्गुरुनीं स्वलिखीत ग्रंथातून मार्गदर्शनातून आयुर्वेदाचे महत्व आजिबाईच्या बटव्याद्वारे जगापुढे माडंलेले आहेत.

परंतू धकधकीच्या जीवनात मनुष्य घरच्या घरी ती औषध वेळेअभावी तयार करु शकत नाही. म्हणूनच प.पू गुरुमाऊली व सेवेकरी वैद्याच्या मार्गदर्शनाने ही औषधी आयुर्वेद आभियानतंर्गत 'ना नफा ना तोटा'या तत्वावर मुळ आयुर्वेदीक संकल्पनेला धरुन आधुनिक यंत्राद्वारे आपल्या गुरुपीठातील'श्री स्वामी समर्थ आयुर्वेदीक फार्मास्युटीकल्स' या विभागामार्फत तयार करुन सर्व भाविकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या कार्यात प्रचार प्रसारात आपले अनमोल योगदान आपेक्षित आहे.

सुदृढ बलशाली भारत होवो, ही सदीच्छा |
'आयुष्यःइति आयुर्वेद:'
gumurtaark
श्रीनिवास सप्तरंगी काढा उपयोगः-
tick सर्व प्रकारचे जुनाट आजारांवर गुणकारी.
tick मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यासारख्या असाध्य आजारांवर विशेष गुणकारी
tick हेंल्थ ड्रिंक म्हणून याचा उपयोग होतो.
gumurtaark
श्रीनिवास बिल्वादी तेल उपयोगः-
tick कानाच्या विकारांसाठी गुणकारी.
tick कान ठणकने, कानातून पस येणे यावर गुणकारी.
tick कमी प्रमाणात ऐकू येणे यावर गुणकारी.
gumurtaark
श्रीनिवास मेदोहर अर्क (गोमूत्र अर्क) उपयोगः-
tick जुना व कोरड्या खोकल्यावर गुणकारी. श्वास व दमा यावर उपयुक्त, ढास व उबळ कमी करते.
tick सर्व प्रकारच्या खोकल्यावर शिघ्र गुणकारी.
tick छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करून शिघ्र आराम देते.

वापरण्याची पध्दतः २/२ चमचे दिवसातून २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर

आहार विहारःऔषध सुरू असतांना आंबट पदार्थ खाऊ नये,थंड हवेत फिरू नये,हलका आहार घ्यावा,गरम कपडे घालावे.

tulsiark
श्रीनिवास तुलसी चुर्ण उपयोगः-
tick सर्दी, पडसे, अंगदुखी, खोकला(अलर्जी), दमा, कृमिनाशक आणि अनुपानासाठी.

वापरण्याची पध्दतः १ ते ३ चमचे समभाग पाण्याबरोबर दिवसातुन ३ वेळा.

आहार विहारःपित्तकर आहार टाळावा. थंड हवेत फिरु नये.

coughsurp
श्रीनिवास कफ सिरप उपयोगः-
tick जुना व कोरड्या खोकल्यावर गुणकारी. श्वास व दमा यावर उपयुक्त,ढास व उबळ कमी करते.
tick सर्व प्रकारच्या खोकल्यावर शिघ्र गुणकारी.
tick छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करून शिघ्र आराम देते

वापरण्याची पध्दतः २/२ चमचे दिवसातून २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर

आहार विहारःऔषध सुरू असतांना आंबट पदार्थ खाऊ नये,थंड हवेत फिरू नये,हलका आहार घ्यावा, गरम कपडे घालावे.

prem
श्रीनिवास प्रमेह-हर काढा उपयोगः-
tick मधुमेह, साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी गुणकारी.
tick काम करतांना उत्साह वाढून् शारिरीक थकवा कमी करते.
tick वारंवार लघवीला जाणे कमी करते.
tick रोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढून उत्साह वाढतो व शरीरात आत्मविश्वास निर्माण होतो.

वापरण्याची पध्दतः २/२ चमचे दिवसातून २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर.

img ५०० वर्षापासून आयुर्वेद हा भारतीय मानव जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. हिंदू धर्मात आयुर्वेद प्रमाण मानले जाते. त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा विचार करून हिंदू धर्मात विविध सन , धार्मिक संस्कारामध्ये औषधी वनस्पती, फुले, पाने, फळे यांचा ऋतुमानानुसार आरोग्यसंरक्षणासाठी उपयोग केले आहे

आयुर्वेदाचे महावाक्य ‘नास्ति मुलंक अनौषधम्’ हे आहे. अशी एकही वनस्पती नाही, जिच्यात औषधी गुणधर्म नाहीत, संत तुकाराम महाराज पण नेहमी म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’.

हिंदू धर्मात्तील सर्व संस्कार हे वेद, स्मृती, सूत्रेक पुराणे इ. परमपवित्र ग्रंथांतील मंत्रांनी सुसंबद्ध केलेले आहेत. या सर्व संस्कारामधून और्वेदोक्त वनस्पतींचा भरपूर उपयोग धर्मचार्यानी केल्याचे जागोजागी दिसते. रोजच्या दिनचर्येत, पंचामृत, पंचपल्लव, तुळस, बेल, दुर्वा, वेगवेगळ्या फुलांचा वापर हिंदू आचार-विचार पद्धतीत दिसतो.

माझ्या मुलाची तब्येत आतिशय नाजूक होती. सतत जीव घाबरणे, भूक न लागणे अशा त्रासाने तो त्रासला होता. बर्‍याच डॉक्टरांकडे आम्ही त्याला दाखवले परंतु त्याच्या प्रकॄतीत काही केल्या सुधारणा होत नव्ह्ती.

अशातच आम्ही एकदा श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेलो असता तेथील दरबारातून मुलासाठी अश्वगंधा घनवटी व सोना-चांदी च्यवनप्राश असे फक्त १ महिन्याकरिताचे औषधे घेतले. श्री स्वामींची सेवा सुरु होतीच व त्यासोबत ही औषधे माझ्या मुलाने घेतली, तब्येतीत हळुहळु सुधारणा होते आहे, असे आम्हाला जाणवले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग यातून आध्यात्मिक ज्ञान तर मिळतेच आयुर्वेद विभागामुळे सर्व सामन्य जनतेला अतिशय अल्प दरात उपयुक्त औषधे सहज प्राप्त होतात. या अनुभवावरुन एकच सांगावेसे वाटते की, महाराजांच्या सेवेत राहिल्याने सर्व प्रकारचे आजर क्षणात नष्ट होतात. या सेवेतून खरोखर आनंद मिळ्तो.

आजीबाईचा बटवा
तळपायाची काळजी घेतली की दृष्टी (डोळे) चांगले राहतात, म्हणून आयुर्वेदात तळपायला तेल लावावे असे सांगितले आहे.
बर्फ किंवा फ्रीजमधील थंड पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात.
रोज वापरणारी मोहरी कफनाशक व वातनाशक आहे.
गुळ, डाळिंब, बीट, तीन पदार्थांनी रक्त उत्तम वाढते.
बर्फ किंवा फ्रीजमधील थंड पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात.
दुध व कुठलेही फळ (आंब्याशिवाय) एकत्र करून खाऊ नये.
शुद्ध सोने रोज पाण्यात उकळून घेतल्यास बुद्धि स्मृती वाढते.
जेवणानंतर तंबाखूशिवाय कलेल्या पानाचा विडा खाल्यास जेवण पचण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी २-२ थेंब शुद्ध तूप नाकात टाकल्यास शांत झोप लागाते.
लोणी, दूध हि सर्वोत्कृष्ट सौंदर्य प्रसाधने आहेत.
अनुभव व अभिप्राय
श्री गुरुकुल पीठ उपक्रम
रक्तदानाचा विक्रम
श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र परभणी येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २७ एप्रिल २०१४ रोजी १४ व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ६०० सेवेक-यांनी विक्रमी रक्तदानाची नोंद केली.