५०० वर्षापासून आयुर्वेद हा भारतीय मानव जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. हिंदू धर्मात आयुर्वेद प्रमाण मानले जाते. त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा विचार करून हिंदू धर्मात विविध सन , धार्मिक संस्कारामध्ये औषधी वनस्पती, फुले, पाने, फळे यांचा ऋतुमानानुसार आरोग्यसंरक्षणासाठी उपयोग केले आहे
आयुर्वेदाचे महावाक्य ‘नास्ति मुलंक अनौषधम्’ हे आहे. अशी एकही वनस्पती नाही, जिच्यात औषधी गुणधर्म नाहीत, संत तुकाराम महाराज पण नेहमी म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’.
हिंदू धर्मात्तील सर्व संस्कार हे वेद, स्मृती, सूत्रेक पुराणे इ. परमपवित्र ग्रंथांतील मंत्रांनी सुसंबद्ध केलेले आहेत.या सर्व संस्कारामधून और्वेदोक्त वनस्पतींचा भरपूर उपयोग धर्मचार्यानी केल्याचे जागोजागी दिसते.रोजच्या दिनचर्येत, पंचामृत, पंचपल्लव, तुळस, बेल, दुर्वा, वेगवेगळ्या फुलांचा वापर हिंदू आचार-विचार पद्धतीत दिसतो.
माझ्या मुलाची तब्येत आतिशय नाजूक होती. सतत जीव घाबरणे, भूक न लागणे अशा त्रासाने तो त्रासला होता. बर्याच डॉक्टरांकडे आम्ही त्याला दाखवले परंतु त्याच्या प्रकॄतीत काही केल्या सुधारणा होत नव्ह्ती.
अशातच आम्ही एकदा श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेलो असता तेथील दरबारातून मुलासाठी अश्वगंधा घनवटी व सोना-चांदी च्यवनप्राश असे फक्त १ महिन्याकरिताचे औषधे घेतले. श्री स्वामींची सेवा सुरु होतीच व त्यासोबत ही औषधे माझ्या मुलाने घेतली, तब्येतीत हळुहळु सुधारणा होते आहे, असे आम्हाला जाणवले.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग यातून आध्यात्मिक ज्ञान तर मिळतेच आयुर्वेद विभागामुळे सर्व सामन्य जनतेला अतिशय अल्प दरात उपयुक्त औषधे सहज प्राप्त होतात. या अनुभवावरुन एकच सांगावेसे वाटते की, महाराजांच्या सेवेत राहिल्याने सर्व प्रकारचे आजर क्षणात नष्ट होतात. या सेवेतून खरोखर आनंद मिळ्तो.