स्वयंपाक घरातील आयुर्वेद

हिंग

जेवण अजीर्ण झाल्यास हिंग, गावरान तूप, गरम पाण्यासह घेणे.लहान बाळाचे पोट दुखत असल्यास हिंगाचे पाणी गरम करून पोटावर लेप देणे. जेवणानंतर पोट दुखत असल्यास हिंग, जिरेपूड, सैधव, तूप जेवणापूर्वी खाल्ल्यास पोट दुखत नाही. दातदुखीवर हिंगाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

हळद

खोकला येत असेल किंवा आवाज बसला असेल तर सुंठ टाकून हळदीचा काढा घ्यावा. सर्दीने घसा खवखवत असेल तर हळदीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मार लागलेल्या ठिकाणी चांगल्या अवस्थेत म्हणजे झाकून ठेवलेली हळदीची पूड दाबून धरल्यास रक्तस्राव लगेच थांबतो. मुका मार लागल्यास किवा सूज आल्यास हळकुंड पाण्यात उकळून गरम करून त्याचा लेप लावावा. दुधाची साय,हरभरा डाळीचे पीठ,हळद लेप करून लावल्यास चेहऱ्याचा वर्ण उजळतो.

जिरे

पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते त्यामुळे बरेचदा पातळ संडास होते. अशावेळेस सुंठ, जिरेपूड प्रत्येकी चिमुटभर ग्लासभर पाण्यात उकळून वारंवार पिणे. स्रियांमध्ये श्वेतस्राव होत असल्यास रात्री १ चमचा जिरे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवणे. सकाळी ते पाणी गळून पिणे. असे १ महिनाभर घेणे. अन्न पचत नसल्यास पाव चमचा जिरेपूड व चिमुटभर हिंग गरम पाण्यासह जेवणापूर्वी घेणे.

सुंठ

आल्याचा रस किंवा अद्रक बारीक करून साखरेत शिजवून त्याचा आलेपाक बनवतात.हा पाक भूक न लागणे,तोंडाला चव नसणे,पित्तामुळे मळमळणे डोके दुखणे यावर उपयोगी. अजीर्ण झाल्यास आल्याचा रस,लिंबाचा रस व सैंधव मीठ घ्यावे. सर्दी झाल्यास आले, दालचिनी, खडीसाखर यांचा काढा घ्यावा. पित्त मळमळ असल्यास सुंठाचे चूर्ण, साखर सारख्या प्रमाणात घेणे. लहान बाळास दुध पचत नसल्यास १ कपभर दुध चिमुटभर सुंठ, १०-१२ वावडिंग दाणे टाकून उकळून पाजणे.

ओवा

पोटदुखी व अजीर्ण झाल्यास ओवा, कालेमीठ गरम पाण्यासह घेणे. पोटात जंत झाले असल्यास ओवा व नागिणीचे पण खाणे. पोटात गुबारा धरल्यास किंवा भूक लागत नसेल तर ओवा, चिमुटभर हिंग, सैधव मीठ गरम पाण्या बरोबर घेणे.

जेष्ठमध

वारंवार खोकला येत असल्यास जेष्ठमध चूर्ण किंवा काडी ३-४ वेळेस चघळणे. मलप्रवृत्ती साफ होण्यास जेष्ठमध चूर्ण प्रत्येकी अर्धा चमचा रात्री झोपताना घेणे.

गायीचे तूप

गायीचे तूप सर्वात उत्तम. अन्नाचे पचन होते, भूक वाढते. तुपाने स्निग्धता येते. उन्हाळ्यात तळपायाची आग होत असेल तर शतधौत घृत चोळावे. आग कमी होते.

शतधौत घृत :- तांब्याच्या ताम्हणामध्ये गायीचे ४ चमचे तूप व १ ग्लास थंड पाणी एकत्र करून फेटावे. हे पाणी थोड्या वेळाने बदलावे. कालांतराने तूप लोणी सारखे पांढरे शुभ्र व मऊ होते. हेच शतधौतघृत. मूळव्याधीत रक्त पडणे, आग होणे यावर लावावे. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. पायाला लावल्याने शांत झोप लागते.

मनुका,खडीसाखर

पित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर मनुके व खडीसाखर वारंवार चघळणे. तापामुळे, काविळीमुळे अशक्तपणा आल्यास ४-५ काळे मनुके, १ अंजीराचा तुकडा, खडीसाखर घ्यावे. लहान बाळास संडास होत नसल्यास ३-४ तस मनुका पाण्यात भिजवून पाणी थोडे थोडे पिणे. खोकल्याने व कफाने दम लागत असल्यास जेष्ठमध, मनुका, खडीसाखर यांचा काढा वारंवार घेणे.

कारली

मधुमेहावर(डायबेटिस)कारलीच्या पानाचा रस कप महिनाभर घेतल्यास १ महिन्यात लघवीतून साखर जाते व मधुमेह बरा होतो. मुळव्याधीवार कारलीच्या फळांचा रस ४ चमचे व साखर ४ चमचे एकत्र करून घेतल्यास १ महिन्यात मूळव्याध बरा होतो. हिवतापावर कारलीच्या पानांचा रस चमचे,जिरे चूर्ण ५ ग्राम व गुळ एकत्र करून ३ दिवस घेतल्यास हिवताप बरा होतो.

कांदा

नाकातून रक्त पडत असल्यास पांढरया कांद्याचा रस कपाळास चोळावा व थंड पाण्याची कपड्याची घडी डोक्यावर ठेवावी.नाकातून रक्त जाणे बंद होते. हृदयरोगावर कांद्याचा रस ४ चमचे साखर २० ग्राम व लोणी २० ग्राम १ महिना दररोज घेणे.हृदयरोग बरा होतो. सर्वे प्रकारच्या विषावर पांढरा कांदा व आवळे पोटभर खावे सर्व प्रकारचे विष जाते.

लिंबू

लठ्ठपणा जाण्यास १ कप लिंबाचा रस व १ कप गरम पाणी एकत्र करून सकाळ संध्याकाळ असे दररोज ३ महिने घेतल्यास वाढलेली चरबी कमी होते. अजीर्ण झाल्यास लिंबूचा रस ४ चमचे ,सैंधवाचे चूर्ण २ ग्राम, पादेलोण चूर्ण,मिरीचे चूर्ण २ ग्राम एकत्र करून घेतल्यास अजीर्ण थांबतो. जुलाब फार होत असल्यास लिंबूचा रस १ चमचा व तूप १ चमचा एकत्र करून घेतल्यास जुलाब थांबतात. तापात लिंबूचा रस ४ चमचे व २ कप गरम पाणी एकत्र देणे आतडे स्वच्छ होतात ताप जातो.

लसूण

मुका मार लागल्यावर लसुनाच्या ५ कळ्या व २ ग्राम मीठ वाटून त्याचे दुखऱ्या जागी पोटीस बांधावे. क्षयरोगावर (टी.बी.) सोललेला लसूण १० ग्राम, १ कप ताकात दररोज घेतल्यास क्षयरोग नाहीसा होतो. केसतोडावर- लसूण व मोहऱ्या वाटून लावावे. कर्णशुळावर व कान वाहत असल्यास लसुणच्या २ कळ्या खोबरेल तेलात तळून व गाळून ते तेलाचे ३/४ थेंब कानात टाकल्यास ७ दिवसात कान ठणकणे व वाहने बंद होते.

माझ्या मुलाची तब्येत आतिशय नाजूक होती. सतत जीव घाबरणे, भूक न लागणे अशा त्रासाने तो त्रासला होता. बर्‍याच डॉक्टरांकडे आम्ही त्याला दाखवले परंतु त्याच्या प्रकॄतीत काही केल्या सुधारणा होत नव्ह्ती.

अशातच आम्ही एकदा श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला गेलो असता तेथील दरबारातून मुलासाठी अश्वगंधा घनवटी व सोना-चांदी च्यवनप्राश असे फक्त १ महिन्याकरिताचे औषधे घेतले. श्री स्वामींची सेवा सुरु होतीच व त्यासोबत ही औषधे माझ्या मुलाने घेतली, तब्येतीत हळुहळु सुधारणा होते आहे, असे आम्हाला जाणवले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग यातून आध्यात्मिक ज्ञान तर मिळतेच आयुर्वेद विभागामुळे सर्व सामन्य जनतेला अतिशय अल्प दरात उपयुक्त औषधे सहज प्राप्त होतात. या अनुभवावरुन एकच सांगावेसे वाटते की, महाराजांच्या सेवेत राहिल्याने सर्व प्रकारचे आजर क्षणात नष्ट होतात. या सेवेतून खरोखर आनंद मिळ्तो.

आजीबाईचा बटवा
तळपायाची काळजी घेतली की दृष्टी (डोळे) चांगले राहतात, म्हणून आयुर्वेदात तळपायला तेल लावावे असे सांगितले आहे.
बर्फ किंवा फ्रीजमधील थंड पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात.
रोज वापरणारी मोहरी कफनाशक व वातनाशक आहे.
गुळ, डाळिंब, बीट, तीन पदार्थांनी रक्त उत्तम वाढते.
बर्फ किंवा फ्रीजमधील थंड पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात.
दुध व कुठलेही फळ (आंब्याशिवाय) एकत्र करून खाऊ नये.
शुद्ध सोने रोज पाण्यात उकळून घेतल्यास बुद्धि स्मृती वाढते.
जेवणानंतर तंबाखूशिवाय कलेल्या पानाचा विडा खाल्यास जेवण पचण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी २-२ थेंब शुद्ध तूप नाकात टाकल्यास शांत झोप लागाते.
लोणी, दूध हि सर्वोत्कृष्ट सौंदर्य प्रसाधने आहेत.
अनुभव व अभिप्राय
श्री गुरुकुल पीठ उपक्रम
रक्तदानाचा विक्रम
श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र परभणी येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २७ एप्रिल २०१४ रोजी १४ व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ६०० सेवेक-यांनी विक्रमी रक्तदानाची नोंद केली.
आयुर्वेदातून आरोग्यप्राप्ती
लवंग :-
सर्दी:- लवंगांचा काढा करून प्यावा.
मूर्च्छा:-लवंग उगाळून अंजन करावे.
कफ व खोकल्यास :- खापरावर लवंग भाजून लाल झाल्यावर त्यावर पांढऱ्या गोकर्णच्या पाल्याचा रस टाकावा. तयार मिश्रणाचे चाटण घ्यावे.
दातदुखी:- लवंग अर्क कापसावर टाकुन तो कापूस दुखऱ्या दातावर ठेवावा

Copyright © 2012 All India Shree Swami Samarth Seva and Spiritual Development Center (Dindori) All rights reserved.