सदगुरू प.पू. मोरेदादानी ७०-८० वर्षापूर्वी याच भूमीत पायी पायी फिरून सदविचार पेरला होता. दारिद्र, दु:ख निर्मुल याचे उपाय सांगितले होते, दीन दलिताची / दारिद्र नारायणाची सेवा केली होती.त्याचा आता मोठा विशाल आम्रवृक्ष झाला. तो मोठ्या मधुर गोड फळांनी लगडला आहे . परिसरात सुगंध दरवतो आहे. योगयोगाने नाही तर विधीने लिहिल्या प्रमाणे अल्पावधीत त्यांच्या सत्कार्यास एक सुंदरस छोटस फळ तर निश्चीतच म्हणता येणार नाही अस एक "१००० बेड" च सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल त्रंबकेश्वर येथे आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या पुढाकराने गुरुवार दि . ११\०४\२०१३ रोजी बिजोरोपण (भूमी पूजन ) झाले आहे. सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल , त्र्यंबकेश्वर भूमीपूजन सोहळा , तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हस्ते झाला आहे ज्यांनी सदगुरू प. पू. मोरेदादांच्या विचारला मोठा मार्ग देऊन भारतभर नेला त्याचा मोठा विशाल शेकडो पारंब्याची उभारलेला वृक्ष बनविला असे प.पू. गुरुमाउली आण्णासाहेब मोरे या भूमीला ईश्वराने दिलेली एक मोठो देणगीच आहे.

नाशिक शहरापासून २५ K.M दूर आसलेल्या त्रंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने केलेली आहे. सेवा दिलेली आहे आणि आता सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून या परिसरातील दीन ,दालीतास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात अध्यात्मिक सुविधात युक्त अध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन होत आहे. अध्यात्मिक व सात्विकतेचा मार्गाने कार्याप्रबण असणा-यांचा श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत .

  • हृदय (कार्डीआक केअर)
  • नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी)
  • किडनी (नेफ्रेलॉजी)
  • कर्करोग (कॅन्सर)
  • मेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी)
  • बालरोग चिकित्सा (नीओ-नेटल, पोस्टनेटल केअर)
  • स्त्रीरोग (गायानेकॉलॉजी)
  • अपघात
  • वातव्याधी
  • मधुमेह
  • रक्तदाब इ.

श्री गुरुपीठात सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल या महत्त्वपुंर्ण विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरूप आकार घेत आहे. जर आपल्याला अन्नक्षत्रासाठी किवा सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटलसाठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुपीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात, तसेच खालील A/C मध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

Account Name :

Akhil Bhartiya Shree Swami Samarth Gurupeeth, Trimbakeshwar
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

Bank Name :

Bank Of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र

Branch Name :

Trimbakeshwar, Nasik
त्र्यंबकेश्वर, नाशिक

A/C No :

60118381917

IFSC Code :

MAHB0001679

Contact No :

02594 – 204252, 9881739771

Email :

अधिक माहितीसाठी absss.gurupeeth@rediffmail.com किवा gurupeeth@rediffmail.com या इमेल वर संपर्क साधा.

Note:

बँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :

Counter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता -absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

आपण NEFT द्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:

Unique Transaction Reference Number (UTR), Pan Number, मोबाईल नंबर व
आपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.
आपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

img ५०० वर्षापासून आयुर्वेद हा भारतीय मानव जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. हिंदू धर्मात आयुर्वेद प्रमाण मानले जाते. त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राचा विचार करून हिंदू धर्मात विविध सन , धार्मिक संस्कारामध्ये औषधी वनस्पती, फुले, पाने, फळे यांचा ऋतुमानानुसार आरोग्यसंरक्षणासाठी उपयोग केले आहे

आयुर्वेदाचे महावाक्य ‘नास्ति मुलंक अनौषधम्’ हे आहे. अशी एकही वनस्पती नाही, जिच्यात औषधी गुणधर्म नाहीत, संत तुकाराम महाराज पण नेहमी म्हणतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’.

हिंदू धर्मात्तील सर्व संस्कार हे वेद, स्मृती, सूत्रेक पुराणे इ. परमपवित्र ग्रंथांतील मंत्रांनी सुसंबद्ध केलेले आहेत. या सर्व संस्कारामधून और्वेदोक्त वनस्पतींचा भरपूर उपयोग धर्मचार्यानी केल्याचे जागोजागी दिसते. रोजच्या दिनचर्येत, पंचामृत, पंचपल्लव, तुळस, बेल, दुर्वा, वेगवेगळ्या फुलांचा वापर हिंदू आचार-विचार पद्धतीत दिसतो.

हॉस्पिटल चे ठळक वैशिष्टये
  • तब्बल २१ एकराच्या विस्तीर्ण परिसरात साकारलेले.
  • अद्ययावत सुविधा असलेले आध्यात्मिक मल्टी-स्पेशालिस्टी हॉस्पिटल.
  • निसर्गौपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणाऱ्या अत्याधुनिक शल्यचिकित्सा व पारंपरिक चिकित्सेचा अनोखा संगम .
  • प्रस्तावित सुविधा :हृदय (कार्डीआक केअर ) , नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी ) , किडनी (नेफ्रेलॉजी ) , कर्करोग (कॅन्सर) , मेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी ), बालरोग चिकित्सा (नीओ-नेटल , पोस्टनेटल केअर ), स्त्रीरोग ( गायानेकॉलॉजी) , अपघात , वातव्याधी , मधुमेह , रक्तदाब इ.
  • एकूण १००० हून अधिक बेडची क्षमता .
  • आध्यात्मिक वातवरणात "दवा और दुवा " या सेतूचा आरोग्यदायी मिलाफ .
  • याशिवाय, एक परिपूर्ण नर्सिंग कॉलेज तसेच डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता निवास व भोजनाची व्यवस्था.
  • जेवणानंतर तंबाखूशिवाय कलेल्या पानाचा विडा खाल्यास जेवण पचण्यास मदत होते.
  • रात्री झोपण्यापूर्वी २-२ थेंब शुद्ध तूप नाकात टाकल्यास शांत झोप लागाते.
  • लोणी, दूध हि सर्वोत्कृष्ट सौंदर्य प्रसाधने आहेत.

Copyright © 2012 All India Shree Swami Samarth Seva and Spiritual Development Center (Dindori) All rights reserved.